Tuesday 24 September 2013

About STD 9 State Board Physics Syllabus

इयत्ता ९ वी सीबीएसई बोर्ड आणि इयत्ता ९ वी स्टेट बोर्ड अशा दोन्ही बोर्डांच्या विद्यार्थ्यांना सायन्स विषय शिकविल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. त्या नोंदविणे अतिशय महत्वाचे वाटले. आपल्या सर्वांना माहित आहे की इ. ९ वी ते १२ वी या चार वर्षांचा स्टेट बोर्डाचा सिलॅबस हा एनसीईआरटी प्रमाणे करण्यात आला आहे. सीबीएसई व आयसीएसई बोर्डदेखील हाच अभ्यासक्रम प्रमाणभूत मानतात.असे केल्याने स्टेट बोर्डाचा विद्यार्थीदेखील  सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड ज्ञान संपादन करील अशी तमाम पालकांची अपेक्षा आहे. मात्र या वर्षीच्या नीट परीक्षेच्या निकालाने स्टेट बोर्डाची मुले खूपच मागे असल्याचे दाखवून दिले. हे असे का घडले याचे उत्तर या बोर्डांच्या (स्टेट बोर्ड व सीबीएसई/आयसीएसई बोर्ड) पुस्तकांत तसेच परीक्षापध्दतीत दडलेले आहे.

इयत्ता ९ वी विज्ञान विषयाच्या प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमात गती, न्यूटनचे गतीविषयक नियम हे घटक अंतर्भूत आहेत. हे दोन्ही घटक दोन बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शिकविताना एकच अभ्यासक्रम शिकवितो आहे असे कधीच वाटले नाही. एनसीईआरटी पुस्तकातील प्रत्येक घटक ८-९ घड्याळी तास चालला आणि तरीही बऱ्याच गोष्टी बाकी राहिल्या तर स्टेट बोर्डाचा प्रत्येक घटक ३ तासात संपला आणि मागे काहीच उरले नाही.

कंटेन्टच्या दृष्टीने दोन्ही पुस्तकांत सारखेच उपघटक सापडतील. मात्र प्रत्येक तत्वामागील स्पष्टीकरण वेगळ्या प्रकारे दिलेले आहे. उदा. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम पाहू. कोणतेही असंतुलीत बाह्यबल वस्तूवर कार्य करीत नसेल तर वस्तूची गती (स्थिर वा सरळ रेषेतील एकसमान गती) कायम राहते हा तो नियम आहे. सामान्यत: विचार करताना हा नियम अशक्यप्राय वाटतो, कारण वस्तूची गती कायम ठेवण्यासाठी बल प्रयुक्त करावेच लागते हा रोजच्या जीवनातील अनुभव आहे. या दोन परस्पर